काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदीपदादा कंद यांचा भावनिक निर्णय — वाढदिवस साजरा न करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ प्रदीपदादा कंद यांचा वाढदिवस रद्द
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांचा झालेला दुर्दैवी बळी लक्षात घेता, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा विद्याधर कंद यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदीपदादा कंद यांनी म्हटलं आहे की, "अशा दुःखद आणि संवेदनशील परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि शुभेच्छुकांनी नियोजित कार्यक्रम रद्द करावेत. मी सर्वांना विनंती करतो की कोणताही उत्सव साजरा करू नये."
त्यांचा हा निर्णय सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे. राष्ट्रप्रेम आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडवणाऱ्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
हाच प्रकारचा भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय हे जनतेला बांधिलकीची जाणीव करून देणारे ठरत आहेत.