गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना मोठे यश
कागल येथे गोरक्षकाकडून दोन टन हून अधिक गोमांस जप्त.
निपाणी प्रतिनिधी
कोल्हापूर बेळगाव NH फोर रोडवर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमांस घेऊन जात आहे यांची गोपनीय माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून गाडी क्रमांक MH42 M 6224 या बोलोरो पिकप गाडी मधून 2टन गोमांस ची बेकादेशीररित्या वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली.
यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देवून कागल कडे पाठवून दिले यावेळी गोरक्षण सेवा समिती कागल, येथील ओंकार त्रिगुणे, व गोरक्षक यांनी NH4 रोड शेजारी अशोका हॉटेलचा समोर कागल येथे सापळा रचून ही गाडी पोलिसांच्या मदतीने रात्री 10- 30वा. जप्त केली,
यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंड यांनी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब यांनी संपर्क करून मदती साठी विनंती केली यावेळी पोलिस निरीक्षक यांनी मदतीसाठी पोलिसांची तुकडी पाठवून दिले,
यावेळी गाडी चालक आतीक मदार बेपारी याच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला यावेळी पुढील तपासणी साठी गोमांस कागल येथील पशु अधिकारी पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले ,
जप्त केलेले गोमोस नष्ट करण्यासाठी कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे जेसीबी ने खड्डा खोदून व केमिकल टाकून जप्त केलेले गोमोस याची विल्हेवाट लावण्यात आली ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे, ओमकार त्रिगुणे, समरजीत जाधव,अथर्व करंजे,सोहम किंकर, प्रेम त्रिगुणे, पार्थ जाधव, केतन कदम, विशाल मर्दानी, अथर्व कस्तुरे, प्रवीण खंबाळे, गुरुप्रसाद पोकले, सागर कोळेकर, या गोरक्षक आणि ही कारवाई यशस्वी केली,
कारवाई मध्ये कागल नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच कागल पोलीस स्टेशने ही कारवाई केली यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या वतीने गोभक्त व गोसेवकांना आवाहन करण्यात आले की कुठल्याही प्रकारे गोमाता व गोवंशां तसेच गोमासयांची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना कळवावे असे आव्हान यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी केले.