राज्य मराठी पत्रकार परिषदेचा मुंबई येथे पदाधिकारी नियुक्ती व मार्गदर्शन मेळावा

Bharari News
0
हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
                मराठी पाऊल पडते पुढे या उक्तीप्रमाणे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी अत्यंत कमी कालावधीमध्ये

 आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून पत्रकारांसाठी आदर्शवत असलेल्या राज्य मराठी पत्रकार परिषदेचा पदाधिकारी नियुक्ती व पत्रकार मार्गदर्शन मेळावा अंधेरी मुंबई येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी मधुसूदन कुलथे यांनी भावी काळामध्ये संपूर्ण देशामध्ये पत्रकारांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी 

फक्त पत्रकारांसाठी स्वतःची बँक तयार करण्याचे संघटनेचे एक चांगले व्हिजन तयार असून जास्तीत जास्त पत्रकारांनी संघटनेमध्ये सहभागी होऊन याचा फायदा घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले, 

याप्रसंगी झालेल्या नियुक्ती यामध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी रवींद्र द्विवेदी मुंबई महानगर अध्यक्षपदी संजय ओर्पे यांची निवड करण्यात आली, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण उर्फ पप्पू शिंदे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर, बाळासाहेब भोर यासह महिला पत्रकार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

झालेल्या नियुक्त्या पुढील प्रमाणे
संजय दांडेकर, शकील बाग सचिन अहिरेकर अध्यक्ष भाईंदर, अशोक रावनांग मालाड, विजय बोथ जोगेश्वरी,जावेद नकवी अंधेरी

पत्रकार सखी महिला मंच
निलेशा राणे अध्यक्ष जोगेश्वरी पूर्व, मनीषा नाईक जोगेश्वरी पूर्व, अनुश्री अहिरेकर जोगेश्वरी पश्चिम, पुनम बिडकर, पूजा येंद्रे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!