शाळेचा सुशोभीकारणासाठी दिले १,११,१११/-रू चिंतामणी विद्या मंदिर थेऊर इयत्ता दहावी 2006 बॅच ची मदत

Bharari News
0

लोणी काळभोर अनिकेत मुळीक

       चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर ता हवेली येथे इयत्ता दहावी 2006 बॅच चा विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा पार पडला.ज्या शाळेने आम्हा विद्यार्थ्यांना घडवले त्या शाळेच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विद्यार्थ्यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा  1,11,111/- निधी संकलित करून त्याचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक नेवाळे सर,माजी मुख्याध्यापक कोतवाल मॅडम, पर्यवेक्षक खरात सर, बांगर सर, ननावरे सर, जढर सर, गायकवाड सर, कंद मॅडम, राजाराम काकडे सर, काटकर सर, भरीत सर यांच्या कडे सुपूर्द केला.
शाळेच्या सायन्स हॉल मध्ये फुलांची सजावट करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. सूत्रसंचालन योगेश काकडे, असीम मणियार , यांनी के
ले. शाळेच्या प्रांगणात सचिन लोणकर, अक्षय कदम ,अभिजीत मदने, तुषार गायकवाड, तुषार गायकवाड, रूपाली हंबीर,दिपाली हंबीर ,प्रियांका काकडे या विद्यार्थ्यांनी तीस झाडे दिली.दत्ता सातपुते, अश्विनी सुतार ,पृथ्वीराज काकडे ,मेघा वहिले ,दिपाली पायगुडे, मोहिनी कदम ,प्राची ढमाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सुप्रिया सुरवसे ,वाळके मॅडम यांनी शाळा या विषयावर छान संगीत सादर केले.
आभार प्रदर्शन संग्राम जगताप यांनी केलं संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नूतन गावडे, सुजित काकडे ,माधवी कुंजीर या विद्यार्थ्यांनी छान प्रकारे पार पाडलं आनंद सोहळ्याचे शोभा वाढवण्याचे काम दत्ता शितकल, रोहित गोरसे ,पुनम कुंजीर, योगराज गायकवाड ,सोमनाथ रिकामे ,राहुल राजगुरू बबन गाढवे ,प्रशांत भोंडवे ,मच्छिंद्र चव्हाण, अविनाश गावडे,अजित साळुंके ,राज साळुंखे ,अश्विनी साळुंखे ,चैताली काळे या विद्यार्थ्यांनी वाढवली आणि सिंहाचा वाटा असूनही मंदाकिनी कांबळे ,कांचन जावळे,सारिका येवले,शुभांगी पाचारणे, रोहिणी जगताप, रेश्मा महाडिक, स्मिता कांबळे, अमोल जगताप, विजय गायकवाड ,अरिफा मनियार चेतन कुंजीर ,दिपाली अवताडे,फौजी सोमनाथ अनारसे, आशुतोष निगडे, शिरीष पवार, अजय वाघमारे, दीपक मस्के, यश राजगे या सामाजिक कार्य व राजकारणात असल्याने काही विद्यार्थी येऊ शकले नाही. या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून कामाचे नियोजन आखून विद्यार्थी नूतन गावडे, योगेश काकडे यांच्या शब्दावर विश्वास व मान ठेवून विद्यार्थ्यांनी रक्कम जमा केली व कार्यक्रमास हजेरीत लावली. प्रवीण दादा शेंडगे ही नेहमी आमच्या कामाची दखल घेत असतात,
त्याबद्दल सर्वांचे आभार माले,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!