अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा,जनतेमध्ये सहानुभूती

Bharari News
0

 सुनील भंडारे पाटील

            आठवड्याभराच्या संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला,           
गेल्या आठवड्याभरापासून महाविकास आघाडी मधील शिवसेना पक्षामध्ये अंतर्गत मतभेद, यामुळे शिंदे गट बंडखोरी करून वेगळा झाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळते की काय हा प्रश्न जनतेला पडलेला होता, सेना गट आणि शिंदे गट यांच्यात चाललेल्या अटीतटीचा संघर्ष मध्ये जुळण्याची चिन्ह दिसत नसल्याने, तसेच सत्तेसाठी संख्याबळ सिद्ध करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश, या सर्व गोष्टींचा विचार करता महाविकास आघाडी सरकार ने निर्णय घेत, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज सकाळी मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले, त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीची गेल्या अडीच वर्षापासून  सत्ता आल्यानंतर केलेला कामाचा आढावा दिला, त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला, शिवसेनेमधील झालेल्या अंतर्गत वादामुळे शिंदे गटाकडूनच शिवसेनेला घरचा आहेर मिळाला, एकंदरीत संख्याबळ सिद्ध करण्याबाबत शंका असल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले, याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टी पक्षाला होणार असून, सरकार स्थापनेची तयारी भाजपने चालू केली आहे, महा विकास आघाडी सरकार कोसळल्याने भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे " मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन " खरे होते की काय अशी चर्चा जनते मध्ये सध्या जोर धरत आहे,
अनेक दिवसांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने, व प्रत्यक्ष राजीनामा दिल्याने, जनतेमध्ये ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती तयार झाली असून, समर्थक तसेच जनतेमधील अनेक स्तरा मधून हळहळ व्यक्त होत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!