हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार ने दिव्यांगासाठी स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सर्व मताने ठराव पास करून महानगरपालिका. जिल्हा परिषद पंचायत समिती. नगरपरिषद .ग्रामपंचायत मध्ये आरक्षण सुरू करावे या मागणी कडे लक्ष वेदन्यासाठी व *शासन निर्णय व दिव्यांग हक्क कायदा यांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणी साठी दिव्यांग बांधवांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय समोर आंदोलन केले*.
आंदोलनाची दखल घेऊन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड याच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली.विभागीय आयुक्त साहेब. व पाच जिल्हा मधिल सर्व कलेक्टर. सर्व जिल्हा परिषद सिवो.महानगर पालिका आयुक्त यांच्या सोबत प्रहार संघटनेची बैठक लावून दिव्यांगाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी दिले. यावेळी बापूसाहेब काने. धर्मेंद्र सातव .रामदास खोत.अमोल कारंडे. दत्ता मिरगणे, रामदास कोळी. अनिता कदम. बाबा जगताप. सुप्रिया लोखंडे. सिध्द राम माळी.सुरेश पाटील ,बळीराम बोडके, बाबा पाडूळे.दिपिका वाघमोडे,जिवन टोपे,आंनद गायकवाड. सुरेश जगताप व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.