हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
...*"आमचं मंडळ, आमचा अभिमान...!"* अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एकता मित्र मंडळ
अरण्येश्वर, तावरे कॉलनी, पर्वती, येथे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून मंडळातर्फे दर चतुर्थी अन्नदान वाटप संकल्प केला जातो. या चतुर्थीला पुन्हा एकदा गरजू मुलांना कपडे वाटप करण्यात आले.
सर्वांच्या माध्यमातून ठरल्याप्रमाणे दर चतुर्थीला गरजू, निराधार व भिक्षुकांना "अन्नदान वाटप" कार्य संपन्न झाला मंडळाच्या सामाजिक कार्याची दखल घेत वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणारे शिंगवी परिवारातर्फे लहान मुला-मुलींचे तसेच मोठ्या स्त्री-पुरुषांचे कपडे दान करण्यात आले व तसेच या निमित्ताने चतुर्थी अन्नदानासाठी मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या आव्हान व विनंतीला प्रशांत लगस, विनायक इंगवले, सुधीर ढमाले, जयेश ढमाले, अथर्व तिवाटणे, संकेत आढाव, चैतन्य ढमाले, केशव अमराळे या देणगीदारांकडून भांडार, वस्तू व आर्थिक स्वरूपात मोठे सहकार्य लाभले.
"श्रींची आरती, आपल्या हाती" उपक्रमातील दहावे मानकरी सन्माननीय मोढवे कुटूंब यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली. यावेळी गणेश भक्तांची मोठ्या संख्यने उपस्तिथी होती. १० वीच्या परीक्षेत ९३% गुण प्राप्त करून एकता मंडळाची शिष्यवृत्ती मिळवणारी साक्षी शिंदे हिने सहकुटुंब बाप्पाचे दर्शन घेतले. हे संपूर्ण गणेश चतुर्थीचे कार्य संपन्न होण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, महिला मंडळ खूप मेहनत घेतात व तसेच मंडळ प्रमुख विनायक इंगवले हे नेहमीच सेवाभावे आचारी म्हणून भूमिका पार पाडत असतात...!