महाराष्ट्रभर ओबीसी महासंघाची रथयात्रा काढणार, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री जोतीराम कुंभार मळेगांवकर

Bharari News
0
हवेली ज्ञानेश्वर पाटेकर      
               पुणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  संघटन गाव पातळीवर अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्यक्षात महाराष्ट्रभर महासंघाची रथयात्रा काढुन सक्षम अशा उमेदवारांना कार्यकारणीत सामावून घेवुन व लवकरात लवकर राहिलेल्या कार्यकारिणी जाहीर करण्यात येतील.
             

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम उमेदवार कार्यकारिणीत सहभागी करून घेतले जातील. बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला यात सामावून घेवुन कार्यकारिणी जिल्हा, तालुका गाव पातळीवर दौरा करून, काम करणाऱ्या व्यक्तींना संधी देण्यात येईल. पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे देखील संघटन करण्यात येईल.
         मंडलला कमंडल आडवे आले, आणि आरक्षणाला धक्का बसला. हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आपल्या सर्वांना मा. खा. हरीभाऊ राठोड साहेब,आ.रामहरी रपनवर साहेब व ॲड. डॉ पी.बी. कुंभार साहेब यांचे हात अधिक बळकट करावे लागतील. यासाठी सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच आपला आवाज पुढे जाऊ शकतो आणि आपण आपले हक्क मिळवू शकतो असे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री जोतीराम कुंभार मळेगांवकर यांनी आपले मत राष्ट्रीय ओबीसी महासंघ व प्रहार मासिक आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महापरिषदेत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर  मा. खासदार माननीय श्री हरीभाऊ राठोड,आ.रामहरी रुपनवर,मा.जलसंधारण, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीपरावजी सोपल, प्रदेश सरचिटणीस सुभाष मुळे, प्रदेश समन्वयक दिपक महामुनी, प्रदेश संपर्क प्रमुख विजय कुंभार, प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मार्तंडे, सोलापुर जिल्हाध्यक्ष शिवशंकर ढवण, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष ग्रामिण महादेव खराडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष, राजाराम कुचेकर, महिला आघाडी उपाध्यक्षा सौ किरणताई शिंदे, पुष्पा कनोजिया, पुणे शहराध्यक्ष राकेश खडके, मराठवाडा अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!