राऊतवाडी येथे सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला   
            राऊतवाडी (शिक्रापूर) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत कृषि संजीवनी साप्ताहमध्ये सोयाबीन पिकाची शेतीशाळाचे आयोजन करण्यात आले होते.         
राऊतवाडी (ता. शिरूर) येथे आयोजीत या शेतीशाळेत शिक्रापूरचे कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी सोयाबीन पिकाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. सोयाबीन पिकासाठी जमीन, वाणाची निवड, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बियाणे उगवणक्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बिबिएफ ने पेरणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार खत वापर, सूक्ष्म अन्नद्रव्याचे वापर,  संरक्षित पाणी व्यवस्थापन, तण नियत्रनाचे उपाय, सोयाबीनवरील कीड-रोग व चक्री भुंगा नियंत्रण तसेच वनस्पतीजन्य अर्काची माहिती देताना जीवामृत ,दशपर्णी अर्क, निबोळी अर्क विषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना कृषि सहाय्यक जाधव यांनी केले.  कृषि विभागाच्या विविध योजना, महाडीबिटी, पी एफ एम ई योजना, फळबाग लागवड योजना पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, हुमणी आळी नियत्रणाचे उपाय याविषयी चर्चा व मार्गदर्शनही या शेतीशाळेत  करण्यात आले. प्रगतशील शेतकरी सवांद दिनानिमित्त रिसोर्स पर्सन दिलीप धर्माजी वाबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले. कमीत कमी आपल्या कुठूबासाठी सेंद्रिय पद्धतीने छोटीसी परस बाग करा व त्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवून खाव्यात.  जेणेकरून आपले आरोग्य आजच्या ह्या भयानक कोरोना, कॅन्सर अशा  आजारापासून संरक्षण मिळेल. या कार्यक्रमास राऊतवाडी येथील प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, नामदेव राऊत, मारुती राऊत, हनुमंत राऊत, गोपीचंद राऊत, विजय विरोळे, काळूराम बालवडे, सुदाम गायकवाड, पुंडलिक राऊत, पंढरीनाथ राऊत, कारभारी भूमकर, तुकाराम राऊत, प्रशांत वाबळे, मल्हारी राऊत, कचरू राऊत, राधु भूमकर, एकनाथ राऊत तसेच येथील अनेक शेतकरी उपस्थित होते. कृषि मित्र तानाजी राऊत यांनी  उपस्थितांचे आभार मानले.

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!