सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
पिंपळनेर ते पंढरपुर श्री संत निळोबाराय पायी दिंडी पालखी सोहळा मार्गाची अतिशय दुरावस्था असून शासनाने याची दखल घ्यावी व रस्त्यांचे काम व्हावे अशी वारकरी व टाकळी कडेवळीत व शेडगाव ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे .
मा . आमदार बबनराव पाचपुतेंच्या मतदार संघातील हा भाग असून त्यांनी अनेकदा या रस्त्यांचे कामांचे नारळ फोडत उद्घाटने करूनही कामे झाली नाहीत . शेजारील भांबुराचे पुढे लागलेल्या रोहीत पवारांचे मतदार संघातील रस्त्यांची कामे झालेली वाटतात पण शेडगाव ,टाकळी ते हिरडगाव पर्यंत रोडची अवस्था दयनीय असून इतके खड्डे पडले आहेत थोडा पाऊस झाला तरी त्यात वारकरी महिला घसरून पडल्याने डॉक्टरकडे न्यावे लागलेचे देवीभोयरेचे ७ नंबर दिंडीतील संदिप मुळे व वारकर्यांनी सागीतले .
शेडगाव येथील शेतकरी बापू गोरे यांनी ४० वर्षात या भागात आमदार पाचपुतेंनी पोत्यानी नारळ फोडले पण कामे झाली नाहीत , अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली . निळोबाराय दिंडी सोहळ्याचे पालखीचे बैलांना खड्यां खुड्यांतून पालखीचा एवढा वजनी रथ ओढतांना दमछाक होते व वारकर्यांना रथाला मागून धक्के मारावे लागतात . त्या मुक्या जिवांकडे पहावत नाही इतके हाल होतात . तिकडे माऊली व तुकोबारायांचे पालखी मार्ग भव्य विस्तारत असता इकडले निळाबाराय व ५० वर दिंड्या श्रीगोंदा ते ईं दांपुर मार्गे पंढरपुरला जातात . . हिरडगाव साखर कारखान्यापासून ते पुढे टाकळी शेडगाव भांबुरा आ . रोहीत पवारांचे मतदार संघाचे हद्दीपर्यतचे रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य असून फारच दुर्दशा झाली आहे . तरी हे दिंड, मार्गाच काम व्हावे अशी वाहक चालक ,दिंडीचालक व वारकर्यांची मागणी आहे .