हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
बहुजन हिताय बहुजन सुखाय ! हे ब्रीदवाक्य असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या बाबुरावजी घोलप माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कला, वाणिज्य आणि सायन्स आणि (व्यवसाय अभ्यासक्रम विभाग) सांगवी, पुणे. २७ येथे शासकीय परिपत्रकानुसार शाळेत विद्यार्थी प्रथम दिवस प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यार्थी शिक्षणाकडे प्रेरित व्हावेत यासाठी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सौ आवारी एस बी आणि उपप्राचार्य श्री निमसे सर यांनी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्याते होते. प्राध्यापक श्री विजय नवले सर करिअर मार्गदर्शक पुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांच्या विनोदी शैलीत अनेक करिअरच्या परी आहे तुमच्यासाठी आहेत या करिअरचे पर्याय ही विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर आपल्या प्रास्ताविकामध्ये उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना करण्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
शाळेच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेतील नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले व इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. श्री. मेमाने सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ खळतकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचे पालकही कार्यक्रमास उपस्थित होते,