सुनील भंडारे पाटील
पिंपळे जगताप (ता शिरूर )येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.मुलांना पुस्तकांचे वाटप करून गुलाब पुष्प देण्यात आले,
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून शैक्षणिक साहित्य व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या, तसेच प्रवेशद्वारावर फुलांच्या माळा सजवून सजावट करण्यात आली होती. शाळेचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करुन नवीन शैक्षणिक वर्षाकरिता शुभेच्छा दिल्या. मुलांच्या स्वागतासाठी सोनाली शिनगारे, शुभांगी पायमोडे, अक्षय लोहकपुरे, स्वप्नील गेंगजे व श्रीकृष्ण हरगुडे यांनी तयारी केली होती.