उबाळेनगर येथील फ्लॅटमधून ८ तोळे ४ ग्रॅम दागिन्यांची चोरी वाघोलीतील उबाळेनगर परिसरात असणाऱ्या सनशाईन अव्हीन्यू इमारतीतील बंद
फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ८ तोळे ४ ग्रॅम दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उबाळेनगर येथील बाळासाहेब लष्कर यांच्या हे सोमवारी (दि.६) सकाळी फ्लॅट बंद करून ऑफीसला गेले होते. सायंकाळी ते परत आले असता घराला कुलूप नव्हते तर आतील सामान अस्तव्यस्त होते. कपाटात ठेवलेले ८ तोळे ४ ग्रॅमचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असल्याचे समजले. याप्रकरणी लष्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.