सुनील भंडारे पाटील
वाडा पुनर्वसन (ता.शिरूर) येथील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.रस्त्यावर खडी टाकल्याने वाहन चालविणे कठीण झाले होते.दुचाकी वाहने खडी वरून घसरले जात अपघात घडत होते
येथील स्थानिक कंपन्यामार्फत रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले.रस्त्याला डागडुजी करत संपूर्ण रस्ता सुरळीत करण्यात आला.या वेळी ग्रामस्थ व वाहन चालक संतुष्ट झाल्याचे पाहण्यास मिळाले. संबंधित ठिकाणी पुढे वाडा पुनर्वसन हे चासकमानचे पुनर्वसित गावठाणात असून लोकसंख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे कोरेगाव-भीमा पासून शहरीकरण जोरदार झाले असून आसपासच्या पंढरीनाथ नगर लोकवस्ती देखील जोडलेली असल्याने तसेच पुढे कोरेगाव भिमा हद्दीतील कंपन्या, सणसवाडी हद्दीतील कंपन्या यामधील कामगार वर्ग संबंधित रस्त्यावरून प्रवास करत असून अनेक वर्षाच्या रस्त्याच्या खराबीमुळे ग्रामस्थांना व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत होते, येथील एका खाजगी कंपनीने योग्य वेळी दखल घेऊन संबंधित रस्त्याची डागडुजी केल्यामुळे आता प्रवास सुरळीत झाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले,