सुनिल भंडारे पाटील
कोरेगाव भीमा व पंचक्रोशीतील गावांमध्ये, वाड्या वस्त्यांवर
हिंदू सणांमधील महत्वाचा समजला जाणारा वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व
पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मागील वर्षी पेक्षा यंदा कोरोना कमी
झाल्याने असंख्य महिला, नवविवाहिता व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या
होत्या.त्याच प्रमाणे वढू बुद्रुक तालुका शिरूर येथे देखील महिलांनी वाटपौर्णिमा उत्साहात साजरी केली
वटपौर्णिमा निमित्ताने कोरेगाव
भीमा दशक्रिया घाट, पेरणे फाटा, कल्याणी चौक, लोणीकंद, तुळापूर फाटा,
वाघोली परिसरात वडाच्या झाडाला दोरा बांधून साता जन्मी हाच जोडीदार मिळावा
यासाठी महिलांनी साकडे घातले. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक
महिलांनी सकाळीच्या वेळीच वडाची पूजा केली तर नोकरीला असणाऱ्या अनेक
महिलांनी दुपार नंतर वडाची पूजा करण्यासाठी परिसरात गर्दी केली होती.
तर
विविध मोठ्या सोसायट्या, बिल्डिंग तसेच ज्या भागात वडाचे झाड नाही अश्या
भागातील महिलांनी वडाच्या फांदीला दोरा बांधत वटपौर्णिमा साजरी केली. तसेच
यंदाच्या पावसाळ्यात वडाच्या झाडा बरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी
विविध प्रकारची झाडे लावण्याचा माणस अनेक महिलांनी व्यक्त केला.