सुनील भंडारे पाटील
माहिती सेवा समितीचे , पिंपळे जगताप ग्रामस्थ यांचे माध्यमातून
पिंपळे जगताप याठिकाणी धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प साकारत आहे २
आक्टोंबर पासून वृक्षलागवडीस सुरुवात केली आज अखेर ११००० झाडे लावली गेली
आहेत त्यांचे संगोपन नियमित चालू आहे आज वटपौर्णिमा असल्याने महीला वडाच्या
झाडाची पुजा करत असतात मधल्या काळात उपजिल्हाधिकारी मा.गोकुळे मॅडम यांनी
देवराई ला भेट दिली व एक संकल्पना मांडली की वटपौर्णिमेला महीलांचे हस्ते
वृक्षारोपण घ्या व ते वडाच्या झाडाचे घ्या आणि त्याचीच पुजा करा
त्याप्रमाणे आज त्याठिकाणी २०० पेक्षा जास्त महीलांनी उपस्थित राहुन वडाचे
झाडांचे वृक्षारोपण केले व त्याच झाडाची पुजा केली.
सदर कार्यक्रमास उपस्थिता मध्ये डींग्रजवाडी चे मा.सरपंच
राहुल गव्हाणे, सौ दिपाली गव्हाणे, जेष्ट पत्रकार शरदराव पाबळे, कमलेश
बहीरट अध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समिती, सौ.मोहीनी तांबे महीला
अध्यक्ष माहिती सेवा समिती हवेली तालुका, संदिप ढफळ, लक्ष्मण दादा गव्हाणे
पुणे जिल्हा अध्यक्ष माहिती सेवा समिती , राजेंद्र तांबे,दिपक जगताप,
सुर्यकांत टाकळकर, गणेश हरगुडे,आबा मगर ,निलेश फडतरे , योगेश सातव, संदिप
जगताप सदस्य ग्रामपंचायत पिंपळे जगताप, शहाजी तांबे मा.सरपंच,सौ राणिताई
जगताप अध्यक्ष वैश्नवी महीला बचत गट, त्याचप्रमाणे वाघोली ,पेरणे फाटा
याठिकाणाहुन शेकडो महिला त्याठिकाणी आल्या होत्या.
शिवम परीवाराचे सर्व कार्यकर्ते या प्रकल्पाला लागेल ती मदत करणारा असल्याचे राहुल गव्हाणे यांनी सांगितले.
प्रत्येक
महीलेने आपल्या घरी १० औषधी झाडे लावली पाहिजेत व ती जगवली पाहिजे
अशाप्रकारचे आव्हान माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी
केले.पुढील काळात बकोरी , पिंपळे जगताप याठिकाणी प्रत्येकी ५ लक्ष्य झाडे
लावण्यात येणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले व आलेल्या सर्व
मान्यवरांचे महीलांचे आभार प्रल्कपाचे सर्वेसर्वा माहिती सेवा
वृक्षसंवर्धन समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी केले.