सुनील भंडारे पाटील
सणसवाडी ता . शिरूर येथील जि . प . शाळेतील विधार्थ्यांचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे उपस्थीतीत पुष्पगुच्छ देवून स्वागत करणेत आले
वह्या व गणवेश वाटप प्रातीनीधीक स्वरूपात सरपंच संगिता हरगुडे, सरपंच परीषदेच्या जिल्हाध्यक्षा सुनंदा दरेकर , उपसरपंच सागर दरेकर , माजी उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर , ग्रा. सदस्य राजेंद्र दरेकर , शशीकला सातपुते , सुवर्णा दरेकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल दरेकर , उपाध्यक्ष सुरज दरेकर , सुवर्णा दरेकर , जान्हवी गायकवाड , माया फुले, आनंद ढापकर, शितल सातपुते ,नवनाथ हरगुडे यांचे हस्ते करणेत आले . आरती दरेकर व दौंडकर मॅडम यांनी स्वागत केले .सुरेश भंडारे सर यांनी प्रस्तावना व कुरंदळे सर
यांनी सुत्रसंचलन केले
वाडा पुनर्वसन प्रशालेत ग्रा. सदस्या वैष्णवी हते , शाळा व्यवस्थापन समितीच्या वैशाली लाटे व ग्रामस्थांचे हस्ते मुलांचे पुष्प , वह्या व शालेय, युनिफॉर्म देवून स्वागत करणेत आले . मुलांची गावातून प्रभातफेरी काढणेत आली . यानंतर हभप पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . श्रीमंत माणुस बुद्धीमान होऊ शकत नाही पण बुद्धीमान मुलगा मात्र नक्की श्रीमंत होऊ शकतो असा विश्वास अनेक उदाहरणे देत मिडगुले यांनी दिला . सुत्रसंचलन रविंद्र शिंदे यांनी केले . मुख्याध्यापक सुनिल मिडगुले यांचे हस्ते ज्ञानेश्वर मिडगुले यांचा सत्कार करणेत आला .