आळंदी : एम डी पाखरे
आळंदी येथील इंद्रायणीतिरी असणारे श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या वर्गात शिकणारे शालेय विद्यार्थी आज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आश्रमामध्ये कीर्तनात अगदी तल्लीन झाले आहेत,
यामध्ये विणेकरी ह भ प रामचंद्र महाराज सारंग तसेच मृदंग वादक कुमारी कल्याणी शिंदे व ज्ञानेश्वरी शिंदे यादेखील मृदुंग वादनात अगदी दंग झाले असून हे विद्यार्थी आपले सर्व देहभान विसरून माऊलींची किर्तन रुपी सेवा देत आहे त्यांना योग्य असे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक ह.भ.प. मोहन महाराज शिंदे हे करीत आहेत. श्री क्षेत्र आळंदी येथे पंढरपुर वारी च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या व वारकरी आळंदीत दाखल झाले असून, असंख्य महिला,पुरुष, तरुण आबाल,वृद्ध, पायी वारी मध्ये सहभागी झाले आहेत, आळंदीला जणू वैष्णवांचा मेळा भरला असून, गेल्या हजारो वर्षांपासून ही परंपरा कायम, वारकरी संप्रदायाने टिकवली आहे, अगदी शैक्षणिक क्षेत्रातील मुलांना देखील वारकरी संप्रदायाने धर्माची, संस्कृतीची, आवड विद्यार्थी व लहान मुलांमध्ये प्रेरित केली आहे,