अण्णासाहेब हजारे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव गणपती ग्रामपंचायत तर्फे गावामध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
             रांजणगाव गणपती येथे जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत तर्फे गावामध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


             भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धीचे संघटक , पुणे जिल्हा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धीचे शिवाजी खेडकर  यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यातर्फे राळेगण सिद्धी कायाकल्प, अनुभवाचे बोल, माहिती अधिकार पुस्तिका मार्गदर्शिका (यशदा )या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
              यावेळी एकूण १०० वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये माननीय रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे , पंचायत समितीचे मा.उपसभापती  आबासाहेब पाचुंदकर पाटील, पंचायत समिती सदस्य  विक्रम पाचुंदकर पाटील ,प्राध्यापक  माणिक खेडकर , लोकनियुक्त सरपंच  सर्जेराव बबनराव खेडकर, उपसरपंच श्री बाबासाहेब धोंडीबा लांडे, सोसायटीचे चेअरमन महेश फंड , ग्रामपंचायत सदस्य संपत खेडकर , अजय गलांडे, श्रीकांत  पाचुंदकर पाटील,   विलासराव अडसूळ , भानुदास शेळके , सुभाषराव लांडे,  शिवाजी खेडकर , शहाजी शेळके , विनायक खेडकर , रोहिदास खेडकर , अमोल पाचुंदकर , तुषार  कुटे, श्री रविंद्र लांडे ,शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक ,विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी  गंगाधर देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!