सुनील भंडारे पाटील
आज शाळेचा पहिला दिवस शरद चंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक ता शिरूर या ठिकाणी आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजने अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत विद्यालयातील 80 विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले .शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आजच्या या शालेय विद्यार्थी स्वागत समारंभासाठी शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब भंडारे त्याचबरोबर माजी अध्यक्ष साहेबराव भंडारे, लक्ष्मण भंडारे संस्थेचे संचालक श्री. राजेंद्र आहेर ग्रामपंचायत वढू बुद्रुक च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या समारंभासाठी सरपंच सारिका शिवले उपसरपंच राहुल कुंभार त्याचबरोबर माजी उपसरपंच लाला शेठ तांबे, कृष्णा आरगडे, माऊली अप्पा भंडारे ,मधील माजी सरपंच श्री अनिल शिवले सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंद मॅडम यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एकनाथ चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे माजी अध्यक्ष श्री साहेबराव भंडारे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री कुरकुटे सर श्री सोमनाथ भंडारे सर व इतर सर्व शिक्षक शिक्षिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.