सुनील भंडारे पाटील
तुळापुर
तालुका हवेली येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे तसेच खरीप शेतकरी प्रशिक्षण वर्ग
आयोजित करण्यात आला त्यावेळी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील डॉ. श्री
वैभव पाटील यांनी सेंद्रिय शेती ,डॉ.काळोखे यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन ,
डॉ. आशिष भोसले यांनी भाजीपाला शेती याविषयी मार्गदर्शन केले,
राज्याच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला
जातो 25 जून ते १ जुलै पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आजचा
बळीराजा सर्वतोपरी स्वावलंबी होण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत कृषी
तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. पिकांची उत्पादकता गुणवत्ता व शेतकऱ्यांची
उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून कृषी विभाग हे तंत्रज्ञान
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सप्ताहात वेगवेगळ्या विषयांचे आयोजन करून
त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले जाते तालुका कृषी अधिकारी
हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली तुळापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले यावेळी कृषी योजनांविषयी तालुका कृषी अधिकारी साळे यांनी माहिती दिली
तसेच मंडळ कृषी अधिकारी खाडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया
उद्योग महिला बचत गट ऊस पाचट व्यवस्थापन याविषयी माहिती दिली कृषी सहाय्यक
अर्चना मोरे यांनी बीज प्रक्रिया याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी सरपंच ॲड.गुंफा इंगळे ,उपसरपंच राजाराम शिवले , मा.सरपंच ज्ञानेश्वर
शिवले ,मा.सरपंच लोचन शिवले व इतर शेतकरी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ
उपस्थित होते,