हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आस्थिर झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांसाठी मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २६ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता श्रेया लॉन्स नाणेकरवाडी चाकण तळेगाव रोड चाकण येथे करण्यात आले आहे
तरी जुन्नर, खेड, आंबेगाव, हडपसर, शिरूर हवेली व भोसरी या विधानसभा मतदार संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ शिवसेना, युवासेना महिला आघाडी व सर्व अंगिकृत संघटना यांनी मेळाव्यास उपस्थित राहून आपणच खरे शिवसैनिक आहोत व आम्ही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर कायम आहे हे जास्तीत जास्त संख्येने दाखवून द्यावे असे जाहीर आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी केले आहे.