सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
जिद्य चिकाटी मेहनत महत्वाकांक्षेच्या बळावर गरीबाचा कमी हुशार
मुलगाही मोठा व यशस्वी माणूस बनू शकतो , असा विश्वास हभप ज्ञानेश्वर
मिडगुले यांनी राळेगण सिद्धी येथील निळोबाराय माध्यमिक विद्यालयात व्याखाना
द्वारे विद्यार्थ्यांना दिला .
संत निळोबाराय
दिंडीसमवेत मार्गातील शाळा कॉलेजानी जावून नवपिढीचे उद्बोधन करताना जेष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांचेआदर्श ग्राम राळेगण सिद्धी येथील निळोबाराय
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपस्थीत ८०० छात्रांचे अनेक दाखले देत
केले . धुळे जिल्ह्यातील भिलवाडीच्या भिल्लाचा मुलगा व करमाळ्यातील
जेवूरचा वडाऱ्याचा शाळेचा कंटाळा असलेला गरीबाचा मुलगा जिद् - चिकाटी -
महत्वाकांक्षेच्या बळावर कलेक्टर झाल्याचे गोष्टीरुपात सांगून मुलांचेत
आत्मविश्वास निर्माण केला . गोडी अभंगाची या विषयावर बोलताना संत
साहित्यातील अभंग, ओवी, गौळण , भारुडादी प्रकारातील चाली,भावार्थ गोड व
चांगला असतो पण तो मुलांपर्यंत पोचत नाही , म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे .
मिडगुले यांचे व्याखानाला तासभर उत्फूर्त प्रतिसाद दिला . प्राचार्य
देशमुख यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केल,