कासारी येथे वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण

Bharari News
0
 शिक्रापूर एन बी मुल्ला सर 
          कासारी येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय आणि आर.एम.धारिवाल जूनियर अँड सीनियर ऍकॅडमीच्या परिसरात वृक्षदिंडी काढून आर.एम.धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई धारिवाल व जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.    
     

   कासारी (ता. शिरूर) येथील गायकवाड विद्यालयातील पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करून सुमारे एक हजार रोपांचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप केले व प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सोयीनुसार वृक्षारोपण करण्याचे तसेच वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व मुक्त व्यायामशाळेचे उद्घाटन शोभाताई धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या घराच्या सभोवती व शेतामध्ये झाडे लावून त्यांची जोपासना करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना शोभाताई धारिवाल यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत व ती सत्यात उतरण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन याप्रसंगी जान्हवी धारीवाल-बालन यांनी केले. या कार्यक्रमास समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, सचिव रोहन ढमढेरे, संचालक दिलीप भुजबळ, कासारीच्या सरपंच सुनिता भुजबळ, शिरूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे, सोमनाथ कुदळे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सरोदे यांनी केले. नसीमा काझी यांनी स्वागत केले. रावसाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर अरुण भुजबळ यांनी आभार मानले.

 


 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!