सुनील भंडारे पाटील
सणसवाडी ( ता.शिरूर) येथील प्रगती नगर नागरिकांना विजेचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून भेडसावत होता . सिंगल फेज असल्यामुळे घरगुती कनेक्शन अनेक दिवसापासून कमी होल्टेज येत असे त्यामुळे विद्यार्थी, नागरिक यांना त्रास सहन करावा लागत असे याबाबत सोसायटीचे चेअरमन सुहास दरेकर व तेथील नागरिकांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांना याबाबत आपली समस्या कळवून सोडवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमदार अशोक बापू पवार यांच्याशी संपर्क साधत विद्यार्थी व नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी केली असता आमदार पवार यांनी याबाबत महावितरण अधिकारी ऐडके आणि महाजन यांना प्रगती नगर येथील थ्री फेज कनेक्शन लवकरात लवकर करावे अशी सूचना केली . त्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसात प्रगती नगरीतील थ्री फेज कनेक्शन तारा बसावल्याने सणसवाडी येथील प्रगती नगर रहिवाशी यांनी आमदार अशोक बापू पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित आप्पा दरेकर,सोसायटीचे चेअरमन सुहास दरेकर यांचे आभार मानले.