संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला मोदकांचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट

Bharari News
0

रांजणगाव गणपती संभाजी गोरडे

                येथील महागणपती मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या औचित्य साधुन विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले संकष्टी चतुर्थीच्या औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

              

संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. शुक्रवार दि . १७ जून २०२२ आज  संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, तसेच  १२ वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. संकष्टी चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी श्री नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली तसेच गणेशभक्त निलेश  नवले यांच्या वतीने मोदकाचा महानैवेद्य करण्यात आला. यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबाणीस संतोष रणपिसे पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. बलवंत मांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!