शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला सर
कासारी(ता. शिरूर) येथील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.५९ टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे यांनी दिली.
कासारी येथील गायकवाड विद्यालयातून ८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ८१ विद्यार्थी उतीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.५९ टक्के लागला आहे. गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- प्रथम - सायली दत्तात्रय रासकर (९५.४ टक्के), वैष्णवी संजय सोनकटाळे (९५.२ टक्के), तृतीय - भूमिका किशोर चौधरी व सायली संतोष नरवडे (९४.६० टक्के). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.