कोरेगाव भीमा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव, शाळा पूर्वतयारी मेळावा,

Bharari News
0
सुनिल भंडारे पाटील
              कोरेगाव भीमा (ता शिरूर ) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तब्बल दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा साजरा करण्यात आला,
           
               पहिली मध्ये दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ शिवाजी राऊत, उपाध्यक्ष दमयंती कांचन यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करण्यात आले,
               
        यावेळी नव्याने दाखल झालेल्या मुलांची प्रभात फेरी गावातून काढण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय जवळ सरपंच अमोल गव्हाणे, सर्व ग्रामपंचायत कार्यकारणी यांनी स्वागत केले, शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश वाटप करण्यात आले, याप्रसंगी  शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नागेश गव्हाणे पाटील, दत्तात्रय फडतरे, शशिकांत गव्हाणे, दीपक गव्हाणे,व  मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, उपस्थित पालक, पदाधिकारी, ग्रामस्थ, यांचे  मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांनी आभार मानले,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!