शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला सर
भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी दिली.
भांबर्डे (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील ४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते हे सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाल्याने शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रथम - सेजल नानासाहेब म्हस्के (८९.६० टक्के), द्वितीय - वैष्णवी सुरेश शिंदे (८८.४० टक्के), तृतीय -भारती शालीकराम डांगे (८८ टक्के).उतीर्ण झालेल्या २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य,१८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे, सचिव बापूराव पवार, कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, संचालक नाथू वीर, शिवाजी वीर, बापूसाहेब पवार, हनुमंत पवार, आदींनी अभिनंदन केले.
शिरूर तालुक्यातील ४६ शाळांचा निकाल १०० टक्के
शिरूर तालुक्यातील ८४ माध्यमिक शाळांमधून ६ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र ६ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात बोर्डाची परीक्षा दिली. यापैकी ६ हजार १७९ विद्यार्थी पास झाल्याने शिरूर तालुक्याचा शेकडा निकाल ९६.७५ टक्के लागला आहे. तालुक्यातील ४६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मारुती कदम, सहसचिव, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ