शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला सर
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेचा दहावी बोर्डाचा निकाल ९५.२ टक्के लागल्याची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण यांनी दिली.
प्रशालेतील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- प्रथम - प्रज्ञा गणेश चौधरी (९६.२० टक्के), द्वितीय - दुर्वा सर्जेराव शिंदे (९४.२० टक्के), तृतीय - केतन काळूराम भुजबळ व साहिल व्यंकटेश राजुरपल्ले (९३.८० टक्के), चतुर्थ - वैष्णवी संदीप ढमढेरे (९२ टक्के), पाचवा - विवेक बाळू भुजबळ व सोहम कैलास जरे (९१.६० टक्के). प्रशालेचा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९०.२४ टक्के लागला असून दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे ,ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.