रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
प्रकाश सापळे लाऊन हुमणी अळीचे योग्यवेळी नियंत्रण करा महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हुमणी अळी नियंत्रणासाठी जनजागृती,
वळवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणी चे भुंगेरे बाहेर येतात व अंडी घालतात त्यावेळी गावातील सर्व शेतकऱ्यांनी सामुहिक प्रकाश सापळे लाऊन भुंगेरे नष्ट करण्याचे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,पुणे श्री ज्ञानेश्वर बोटे व उपविभागीय कृषि अधिकारी,राजगुरुनगर श्री मनोजकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. भरपूर शेतकर्यांनी प्रतिसाद दिला व काही प्रमाणात भुंगेरेचे नियंत्रण झाले.तसेच तालुका कृषि अधिकारी , शिरूर श्री शिद्धेस ढवळे यांच्या मार्गदशनाखाली खरीप पूर्व प्रशिक्षणात सर्व शेतकऱ्यांना ह्याविषयी माहिती सर्व तालुक्यात देण्यात आलेली आहे.पण हे सामुदाईक सर्व शेतकरी करणे गरजेचे आहे.एकदा का हुमणी जमिनीत गेली कि त्याचे नियंत्रण करणे फार जिकरीचे होते व त्यातल्या त्यात वाढलेल्या ऊसामध्ये म्हणून कृषिविभाग ,कृषि विज्ञान केंद्र व साखर कारखाने ह्याचे संदेशाचे पालन सर्व शेतकर्यांनी करणे गरजेचे आहे असे वाटते. ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या किडीकडे दुर्लक्ष केल्यास पिकांचे नुकसान होते.
आज गणेगाव खालसा येथे मंडळ कृषि अधिकारी श्री अशोक जाधव यांनी व कृषी पर्यवेक्षक संतोष जगताप कृषी सहाय्यक अनिल देशमुख यांनी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रकाश सापळे लावलेल्या ठिकाणी जाऊन हुमणी भुंगेरे याची पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांना समुदाइक पद्तीने भुंगेरे प्रकाश सापळे लाऊन नियंत्रण करण्याचे आव्हान केले.
हुमणी भुंगेरे नियंत्रण कार्यक्रमास गणेगाव खालसा येथील पंकज बांगर, शरद भोसले, योगेश चातुर , बबन नाणेकर,सतीश भोऱ्हाडे , आकाश दळवी व अशोक बांगर हे प्रगतशील शेतकरी उपस्थित होतो.