सुनील भंडारे पाटील
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड,
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चांगलेच वातावरण तापले होते, शिवसेनेमधील अंतर्गत वाद विवाद यामुळे एकनाथ शिंदे गटाने सुमारे 50 आमदार एकत्र करून स्वतःचे अस्तित्व तयार केले, याचा फार मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला, परिणामतः गेल्या अडीच वर्षापासून सत्तेत असणारे महाविकास आघाडी सरकार कोसळले, शिवसेना पक्ष अंतर्गत वातावरण तापल्याने एकमेकांवरील धारदार शाब्दिक चकमकीमुळे अखेर शिंदे गटाने भाजपा शी सलगी करत राज्यात सरकार स्थापन केले, एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे जुनी भाजप शिवसेना युती पुन्हा एकदा सत्तेत आली, सुप्रीम कोर्टाने संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा दिल्या, महाराष्ट्र राज्यासाठी एकत्र येऊन कामे करू असे सांगितले,