लोणी काळभोर अनिकेत मुळीक
उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छा तसंच भविष्यात पुन्हा एकत्र येण्याच्या काही शक्यता यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या राजीनाम्याने आम्हाला आनंद झालेला नाही. एक भूमिका घेऊनच हा निर्णय घेण्यात आला होता”.
“शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्वीकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले “उद्धव ठाकरेंची प्रतिमा…”
एकनाथ शिंदे यांनी यावेळी, “आमच्याकडे जास्तीचं संख्याबळ असून विधिमंडळात शिवसेना पक्ष म्हणून आम्ही कार्यरत आहोत,” असंही स्पष्ट केलं.
भाजपाचं धक्कातंत्र
एकनाथ शिंदे हे गुरुवारी दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि रात्री शपथ घेणार, असेच चित्र होते. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र एकनाथ शिंदे हे रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केल़े त्यावेळी नाटय़मय घडामोडींचा पहिला अंक पाहायला मिळाला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी माझी असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. राजभवनात शपथविधी सोहळय़ाची तयारी सुरू असतानाच नाटय़मय घडामोडींचा दुसरा अंक घडला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी सहभागी व्हावे, असा पक्षाचा आदेश असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फडणवीस हे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यानंतर थोडय़ाच वेळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केलं असून त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी ही निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.