सुनील भंडारे पाटील
तुळापूर तालुका हवेली, मरकळ तालुका खेड मार्गे आळंदी ला जोडणारा रस्त्यावरील महत्त्वाचा पूल धोकादायक झाला असून, दुर्घटना घडण्याची शक्यता,
संबंधित पूल
महत्त्वाच्या मार्गावर असून, पुणे नगर रोड लोणीकंद येथील आळंदी फाटा पासून
पुढे आळंदी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी, तसेच धर्मवीर छत्रपती श्री
संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर या अतिशय महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना
जोडणारा हा मार्ग आहे, संबंधित पुलाची अवस्था अतिशय दयनीय असून, संरक्षण
भिंत नाही, शिवाय जास्त वजनाच्या गाड्या जाताना पुल पूर्णपणे हादरतोय,
पुलावर उभे राहिला असता, पूल हलताना जाणवतो याचा अर्थ हा पूल कधीही कोसळू
शकतो, व मोठी दुर्घटना घडू शकते, शेतमाल वाहतूक, संलग्न लहान मोठे व्यवसाय,
औद्योगीकरण, विद्यार्थी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारकरी सांप्रदाय,
आळंदी पंढरपूर दिंडी या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने, सरकार काय मोठ्या
दुर्घटनेची वाट पाहत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे, संबंधित पूल
नवीन बांधकाम व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
तुळापूरच्या
सरपंच ॲडव्होकेट गुंफा इंगळे यांनी सांगितले की संबंधित पुल वाहतुकीसाठी
अतिशय धोकादायक झाला असून नवीन पुलाच्या बांधणीसाठी निधी मंजूर झाला आहे,
बांधकाम लवकर होण्याची विनंती आम्ही करत आहोत, पुल वाहतुकीस धोकादायक
असल्याचे बोर्ड सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूला लावले आहेत,
एकंदरीत
पूल धोकादायक झाला असल्याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे व त्या
संदर्भातील नोटीस बोर्ड पुलाच्या दोन्ही बाजूला लावले आहेत, ह्याने वाहतूक
थांबते का? आणि निधी दिला आहे तर मग मोठी दुर्घटना झाल्यानंतर काम चालू
होणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे,