शिंगवे शाळेतील बाळगोपाळांनी काढली संत तुकाराम महाराजांची पालखी

Bharari News
0


आंबेगाव - प्रमिला टेमगिरे
                अनमोल संस्कृती आणि संताची भुमी म्हटलं की महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राची संस्कृती आणि संताची वाणी हे महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले वरदान आहे. आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्त पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी येत असतात.              
विद्यार्थ्यांनवर उत्तम संस्कार व्हावेत व वारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी शिंगवे येथील अंगणवाडीच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भैरवनाथ मंदिराजवळ ग्रामस्थांनी पालखीचे  स्वागत केले. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी तुलसी वृंदावन ,फुगडी, टाळ मृदुंग वाजवत, हरिनामाचा जयघोष करत पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. हा नाविन्यपूर्ण उपक्रम अंगणवाडी पर्यवेक्षिका जयश्री लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका कल्याणी भागवत,शोभा फोखरकर यांनी राबविला. यावेळी ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे,  पोलिस पाटील गणेश पंडीत, नविन सोनवणे, रतनशेठ वाव्हळ, नथु गोरडे ,शंकर कासार, महिला पालक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!