गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
गुनाट (ता. शिरूर) येथील गुणवंतवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे
गुणवंतवाडी येथील गिरमकर वस्ती येथे शेतकरी सोमनाथ दत्तात्रय गिरमकर हे रोजच्याप्रमाणे आपल्या गोठ्यात मेंढ्या बांधून घरात झोपले होते पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान अचानक आवाज झाल्याने जाग आली असता गोठ्यामध्ये दोन मेंढ्या जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या
ही घटना सोमनाथ गिरमकर यांनी तात्काळ माजी सरपंच अनिल करपे यांना सांगून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती वनसेवक नवनाथ गांधले व वनरक्षक विशाल चव्हाण व पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर रोहिदास बोऱ्हाडे यांच्याशी संपर्क करून सविस्तर सांगितली त्यावेळी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला