शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी मारुती कदम तर सचिवपदी नामदेव चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सभासदांची बैठक पदाधिकारी निवडीसाठी शनिवार (दि. १६ जुलै) रोजी शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल शितोळे होते. या बैठकीत विविध शैक्षणिक समस्या आणि शैक्षणिक धोरणावर चर्चा करून शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणीची सन २०२२ ते २०२५ साठी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- मारुती सिताराम कदम (अध्यक्ष), चंद्रकांत धोंडीबा वाव्हळ (कार्याध्यक्ष), अनिल पोपटराव शिंदे (उपाध्यक्ष), सुभाष भागा साबळे (उपाध्यक्ष), नामदेव बाबुराव चौधरी (सचिव), प्रकाश शिवाजी गावडे (सहसचिव), फारूकअहमद मोहम्मदहनीफ सांगलीकर (सहसचिव), भाऊसाहेब यशवंत वाघ (खजिनदार), एम. टी. कुंभारकर (सदस्य), सुनील भिवाजी थोरात (सदस्य), राजू किसन घोडके (सदस्य), शहाजी भिकाजी भोस (सदस्य), बाळासाहेब सोनवणे (सदस्य), दत्तात्रय विष्णू बनसोडे (सदस्य), एकनाथ शंकरराव चव्हाण (सदस्य), सतीश दत्तात्रेय पोटे (विनाअनुदानित प्रतिनिधी), अविनाश क्षिरसागर (विश्वस्त), विठ्ठल निवृत्ती शितोळे (विश्वस्त), सुभाष जयवंत वेताळ (सल्लागार), आर.बी.मेंगवडे (महिला प्रतिनिधी), तुकाराम तात्याभाऊ वाघमारे (सल्लागार). निवडीनंतर कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिरूर तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्ता वारसा संपूर्ण महाराष्ट्रात मोठा आहे. विविध शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थी झळकली आहेत. त्यातूनच शिरूर तालुक्याने मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत. तसेच शाळांच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे आणि प्रशासकीय अधिकारी निर्माण करणे यासाठी मुख्याध्यापक संघ काम करेल असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित
तालुकाअध्यक्ष मारुती कदम यांनी सांगितले.
दरम्यान शुक्रवार (दि. १५ जुलै) रोजी देखील मुख्याध्यापक संघाच्या विद्यमान तालुका कार्यकारिणीने शिक्रापूर येथे बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर केली होती. तर दुसऱ्याच दिवशी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल शितोळे व माजी सचिव मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापकांची बैठक घेऊन नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिरुर तालुक्यातील कांही मुख्याध्यापक तर दोन्ही बैठकीना उपस्थित होते. दोन्ही गट आपलीच कार्यकारिणी खरी मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी असल्याचा व बहुमत आपल्याच पाठीशी असल्याचा दावा करत आहेत. खरी कार्यकारिणी कोणती हे काळच ठरवेल. सध्या मात्र तालुक्यातील शिक्षकांमध्ये यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.