पुणे प्रतिनिधी
तेजस सतीश ब्राम्हणे सर यांची पुणे महानगर पालिकेचे स्व.श्यामराव श्रीपती बराटे प्रायमरी स्कूल वारजे माळवाडी,पुणे येथे शिक्षक म्हणून नियुक्ती...
हरेगाव तालुका श्रीरामपूर येथील तेजस ब्राम्हणे यांची नुकतीच शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. मूळ श्रीरामपूर येथे जन्मलेल्या तेजस यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1992 मध्ये झाला.घरची परिस्थिती मध्यम कुटुंबाची असली तरीही आई सौ.शिला या प्राथमिक शाळेत शिक्षिका तर वडील श्रीरामपूर एस.टी.महामंडळ डेपो येथे क्लार्क म्हणून काम पाहत आहे.
तेजस यांना एक भाऊ व एक बहिण.तेजस यांचे लहानपणीचे शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत संत तेरेजा बॉईज हायस्कूल हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे झाले.लहान पणापासून चंचल असलेला तेजसला पाहून मम्मी पप्पांनी पुढच्या शिक्षणासाठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सैनिकी स्कूल कोपरगाव येथे पाठवले.बारावी झाल्यानंतर जायचे कुठे असा सवाल त्याच्या समोर होता?
त्यावेळेस डी.एड.ला जास्त स्कोप होता,मग विद्येचे माहेरघर म्हणून जगात ख्याती असलेल्या पुणे शहरात सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीम.कांताबाई पानसरे कॉलेज मध्ये इंग्लिश माध्यम मध्ये ऍडमिशन घेऊन दोन वर्ष पूर्ण केले. डी.एड.करत असताना भरपूर मित्र परिवार जमवला.कॉलेज मध्ये हुशार आणि शिक्षकांचा आदर्श विद्यार्थी म्हणून व्यक्तिमत्वाला नावलौकिक राहिला.
ते शिक्षण पूर्ण होऊन बी.ए .साठी ऍडमिशन घेऊन ग्रॅज्युएशन इंग्लिश माध्यम मध्ये पूर्ण केले.असे संपूर्ण बी.ए .डि.एड म्हणून पदवी प्राप्त केली.त्यानंतर केंद्र शासनाची शिक्षक अभियोग्याता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाला.हे सर्व करत असताना अभ्यासाची गोडी सुटत नव्हती.
नोकरीच्या शोधाने अनेक संकटाना सामोरे जावे लागले.काही दिवस घरी तर काही दिवस नोकरी करत आपले ध्येय पूर्ण करावे लागले.कष्टाची पराकाष्ठा करून आपण उंच शिखरावर पोहोचला. विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्व.श्यामराव श्रीपती बराटे प्राथमिक शाळा वारजे माळवाडी येथे शिक्षक म्हणून रुजू झाले.हि गोष्ट मित्र परिवाराला समजल्यानंतर सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीम.कांताबाई पानसरे कॉलेज मधील मित्र परिवाराने भरपूर शुभेच्छा दिल्या.