सासवड:प्रतिनिधी :बापू मुळीक
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अतिशय संवेदनशील मनाचे, कार्यकुशल, तडफदार नेतृत्व मा. ना. अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका फार्मसी महाविद्यालय, सासवड येथे विविध उपक्रम राबवण्यात आले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहाय्यक सहसचिव ए. एम. जाधव व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक उपक्रम म्हणून सोनोरी मल्हारगड पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सामाजिक साहाय्य म्हणून जीवनवर्धिनी निवासी मतिमंद विद्यालय दिवे, सासवड येथे महाविद्यालयातर्फे खाऊ वाटप करण्यात आला.
तसेच पर्यावरणाला घातक असलेले प्लास्टिक विषयी विद्यार्थ्यांमार्फत सासवड शहरामध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली व वाघिरे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा भोसले यांच्या उपस्थितीत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्लॅस्टिकच्या वस्तू संकलित करून सागर मित्र अभियान-पुणे यांच्याकडे देण्यात आले व हा उपक्रम कायमस्वरूपी महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, राज्यस्तरीय सायकल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्हाट्सअँप कोट व स्लोगन स्पर्धा, इ-पोस्टर प्रेझेन्टेशन, व्याख्यान, लॅबोरेटरी सेफ्टी प्रॅक्टिस यावर कार्यशाळा इ. उपक्रम घेण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते,