आंबेगाव प्रमिला टेमगिरे
श्री भीमाशंकर दर्शनासाठी येणार्या भाविकांना प्रशासन व पोलीस खात्याचे आवाहन करण्यात येत आहे, पावसाचा जोर, रस्त्यांमधील अडथळे, या सर्वांचा विचार भाविकांनी करून प्रवास करा व शांततेत दर्शन घ्यावे यासाठी काही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे
1.भीमाशंकर देवस्थान या ठिकाणी जाण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे.
2. सदर रस्त्याचे काम सुरू असून सुमारे 500 मीटर लांबीचा रस्ता सिमेंट काँक्रेट मध्ये बनवला असून त्याची उंची जमिनीपासून एक फुटापेक्षा जास्त आहे.
3. सदरच्या रस्त्याची बाजूची साईड पट्टी भरली नसल्यामुळे व ती आत्ता भरता येणे शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी दाट धुके व पावसामध्ये काही गाड्या रस्त्यावरून खाली उतरतात. त्यामुळे क्षणार्धात वाहतूक कोंडी तयार होते.
सदर अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाने खालील प्रमाणे व्यवस्था केली आहे.
भीमाशंकर मंदिरापासून पाच किलोमीटर वर पार्किंग क्रमांक चार व त्यानंतर तीन किलोमीटर अंतरावर पार्किंग क्रमांक तीन, दोन किलोमीटर अंतरावर पार्किंग क्रमांक दोन आणि एक किलोमीटर अंतरावर दोन चाकी वाहन पार्क करण्यासाठी पार्किंग क्रमांक एक अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदरचे पार्किंग पासून भीमाशंकर बस स्टॅन्ड पर्यंत भाविकांना ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे.
सदर बस मधूनच भाविकांनी प्रवास करावा त्यामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळता येते आणि दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होतो.
परंतु काही भाविक पुढील चुका करतात त्या टाळता येणे शक्य आहे.
1. एखादी गाडी रस्त्यावरून घसरल्यामुळे किंवा छोटा अपघात झाल्यामुळे किंवा पार्किंग मधून वाहन बाहेर काढताना तात्पुरत्या स्वरूपात वाहतुक कोंडी होते.अशा वेळी वाहन धारकांनी संयम बाळगला पाहिजे. परंतु तसे न करता ओव्हरटेक करण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहन पुढे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाहन धारकांनी विरुद्ध दिशेने ओव्हरटाके करू नये.
2. रस्त्यामध्ये असणारे छोटे धबधबे किंवा सेल्फी पॉईंट यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक पर्यटक व भाविक बेशिस्तपणे गाडी पार्क करून फोटो काढण्यासाठी जातात पोलिसांनी हटकल्यानंतर दोन मिनिटात जातो अशा प्रकारचे उद्योग उत्तर देतात परंतु त्यांच्या दोन मिनिटांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. अशा वाहनधारकांच्यावर त्याच ठिकाणी कारवाई करीत असताना आणखी वाहतूक कोंडी होते त्यामुळे त्याला हाकलून लावणे एवढेच काम पोलिसांना करावी लागते. यानंतर अशा वाहनधारकांना गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयाकडून समन्स काढण्यात येणार आहे बरेच वेळा वाहन मालक किंवा चालक आपले नाव पत्ता सांगत नाहीत व कागदपत्र न दाखवता निघून जातात अशा वेळी गाडी नंबर नुसार ज्याच्या नावावर गाडी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
3. अनेक भाविक व पर्यटक हे राजकीय नेते व अधिकारी यांचे फोन आणून पोलिसांचा वेळ वाया घालवतात व यादरम्यान त्यांनी पार्किंग मध्ये वाहन नेल्यामुळे वाहतूक कोंडी होते. वास्तविक पाहता नागरिकांच्या भल्यासाठी पोलीस पार्किंग सुविधा उपलब्ध करून देताना भर पावसात रस्त्यावर दिवसभर उभे असतात. अशावेळी एखादे वाहन पुढे सोडले तर त्या वाहनातील लोक दर्शन करून येईपर्यंत ते वाहन कुठेतरी रस्त्यावरच उभे असते कारण पुढे पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणाचाही फोन आणला किंवा हुज्जत घातली तरीही वाहन गर्दीच्या वेळी पुढे सोडणे शक्य होत नाही. सदरची वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणीही पोलिसांच्या बरोबर वाद न घालता आपले वाहन नेमलेल्या पार्किंगमध्ये पार्क करून शासकीय बसणे दर्शनासाठी जावे.
4. अनेक सुशिक्षित नागरिक हे अत्यंत आजारी व वयोवृद्ध लोकांना घेऊन दर्शनासाठी येतात अशा ज्येष्ठ लोकांच्या बाबत पोलीस प्रशासनास आदर व सहानुभूती आहे. परंतु अत्यंत गर्दीच्या वेळी त्यांना घेऊन येणे हे जोखमीचे असून त्यांचे वाहन सुद्धा पार्किंगची समस्या व एकेरी रस्ता याचा विचार करता पुढे सोडता येत नाही. तरी ज्या सुज्ञ नागरिकांचे पालक आजारी आहेत किंवा अत्यंत वयोवृद्ध आहेत अशा लोकांना देवदर्शनासाठी गर्दीचे दिवस सोडून घेऊन यावे जेणेकरून अशा ज्येष्ठ लोकांची गैरसोय होणार नाही.
5. पार्किंग क्रमांक एक ते चार हे सर्वांच्या सोयीनुसार पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जवळचे खाली झालेल्या पार्किंगच्या ठिकाणी वाहने सोडली जातात अशा वेळी काही लोकांना दुसरी वाहने पुढे सोडली आमचे वाहन पाठीमागे अडवले असा गैरसमज होतो व ते लोक पोलिसांच्या बरोबर वाद घालतात. अशा लोकांनी नेमकी परिस्थिती समजून घ्यावी.