सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, शक्तीपीठ, बलिदानपीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता शिरूर)
येथील अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज
समाधी स्मारकाचे विकास काम होणार असून दैदिप्यमान स्मारक उभे राहणार आहे,
असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , व शिरूर हवेली विधानसभा
मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी सांगितले, गेल्या आठवड्या भरापासून राज्यात सरकार बदलल्यामुळे , व्हाट्सअप,
स्टेटस, फेसबुकच्या माध्यमातून समाधी स्थळ विकास निधी थांबवल्याची अफवा
पसरवली जात होती, त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ
विकासासाठी दिलेले राज्य शासनाचे सुमारे 200 कोटी रुपये निधी, विकास आराखडा
तयार झाल्यानंतर थांबवला की काय? असे संभ्रमाचे वातावरण, पंचक्रोशीत तसेच,
जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये तयार झाले होते,
त्यामुळे शंभू प्रेमी,
शिवप्रेमी, राज्यातील जनता यांचे धाबे दणाणले होते, परंतु निधी थांबवल्या
संदर्भात असे कुठल्याही प्रकारचा शासनाचा अथवा राज्य सरकारचा अधिकृत आदेश
नसताना, काही खोडसळ व्यक्ती प्रसार माध्यमातून समाजामध्ये अफवा पसरवत आहेत,
त्याला कोणीही बळी पडू नये, देशामध्ये राज्यामध्ये दुसरी पंढरी समजल्या
जाणाऱ्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी
महाराजांचे दैदीप्यमान स्मारक उभे राहणारच,
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, राज्यात मंजूर केलेली
कामे मंजुरी न थांबवता होणारच, विशेषता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे
आपले आराध्य दैवत असून हे काम आम्ही पूर्ण करणार,
खासदार
अमोल कोल्हे यांनी सांगितले की, काल मुख्यमंत्री यांनी स्मारक होणार
असल्याचे सांगितले कार्यालयीन चर्चेनंतर काय आहे ते मी सांगतो,
शिरूर
हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी सांगितले की, निधी
थांबवण्याबाबतीतला अशी कुठलीही प्रक्रिया झाली नाही, सोशल मीडियाच्या
माध्यमातून काही लोक गैरसमज पसरवत आहेत, लोकांनी गैरसमज करून घेऊ नये व बळी
पडू नये, कालच मुख्यमंत्र्यांनी स्मारक होणार असण्याचे पुन्हा सांगितले
त्यामुळे स्मारक हे होणारच,