सुनील भंडारे पाटील
शिरूर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्ष पदी सुजित मैड यांची नुकतीच निवड करण्यात आली
माहितीचा अधिकार हा कायदा ऑक्टोबर २००५ पासून अस्तित्वात आला. भ्रष्टाचाराला आळा बसून सरकारी कामात पारदर्शकता आणणे व त्याबद्दल उत्तरदायी ठरवणे ही कायद्याची उद्दिष्टे आहेत. परंतु आज ही अनेक सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहेत. त्यामुळे या कायद्याची सर्व जनमानसात माहिती पोहचवून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वराज बहूद्देशीय संस्था संचालित, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची (रजि.) स्थापना करण्यात आली. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मैड यांची माहिती अधिकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केली,