आंबेगाव मिलिंद टेमकर
मंचर (ता आंबेगाव) येथे एक कॉल प्रॉब्लेम सॉल ह्या हेल्फ लाईन चे उद्घाटन भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
मंचर शहरातील नागरिकांना कोणत्याही समस्ये साठी एका कॉल वरती समस्या निराकारण करण्यात येईल असे पक्षाचे तालुका अध्यक्ष कराळे यांनी सांगितले. ह्या प्रसंगी भाजपा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे,संघटन प्रमुख संदीप बाणखेले, आरोग्य दूत बाबू थोरात, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मेघश्याम भोर, मंचर शहर अध्यक्ष गणेश बाणखेले,सह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या माध्यमातून नागरिकांना समस्या सोडविण्यात येतील.