शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी येथे आनंददायी व सर्वांगीण
विकास शिक्षण उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य
संजीव मांढरे यांनी दिली. निमगाव
म्हाळुंगी येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात आलेला
शैक्षणिक सर्वांगीण विकास उपक्रम.(छाया : नमीरा डिजीटल)
निमगाव
म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत शैक्षणिक
सर्वांगीण विकास व जीवन कौशल्य उपक्रमांतर्गत अनुभवातून शिक्षण उपक्रम
राबवताना मॅजिक बस प्रकल्पचे समन्वयक उमेश साळवे व त्यांचे सहकारी यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी खेळाचे महत्त्व सांगितले व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमवेत विविध
खेळ खेळत विद्यार्थ्यांना अभ्यास व खेळामध्ये समन्वय कसा राखायचा याचे
प्रशिक्षण दिले. हसत- खेळत शिक्षण ही संकल्पना सार्थ होण्याची अनुभूती ही
विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण
मिळण्यास मदत होणार असल्याचेही याप्रसंगी बोलताना प्राचार्य मांढरे यांनी
सांगितले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित
होते.