तळेगाव ढमढेरे शिक्षक-शिक्षकेतर पतसंसंस्थेच्या अध्यक्षपदी रुपाली ढमढेरे तर सचिवपदी नितीन माने

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
          तळेगाव ढमढेरे शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंसंस्थेच्या अध्यक्षपदी रुपाली अनिल ढमढेरे तर सचिवपदी नितीन श्रीहरी माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.डी. पुंड व सचिव एस.बी. ठुबे यांनी काम पाहिले.        
तळेगाव ढमढेरे शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंसंस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी.(छाया : नमीरा डिजीटल)
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे नुकत्याच झालेल्या तळेगाव ढमढेरे शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंसंस्थेच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. पतसंसंस्थेची नवनिर्वाचित अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-  संजय ज्ञानदेव फलके (उपाध्यक्ष), शांताराम आप्पासाहेब कांबळे (खजीनदार), प्रवीणकुमार बबनराव जगताप (संचालक), अशोक अंबादास दहिफळे (संचालक), शरद लक्ष्मण ढमढेरे (संचालक), फारुकअहमद मोहम्मद हनिफ सांगलीकर (संचालक),  विनायक वसंत नरवडे (संचालक),  प्रतिभा अरुण जाधव (संचालक), किशोर परशुराम गायकवाड (संचालक). निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सभासदांची गरज ओळखून त्यांना आवश्यक ते अर्थसाहाय्य केले जाईल असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षा रुपाली ढमढेरे यांनी सांगितले.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!