सासवड बापू मुळीक
संत सावता महाराज श्रावणी पायी वारी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील सासवड येथील श्री संत सोपानदेव मंदिरातून दि. (२९ जुलै) दुपारी श्रीक्षेत्र सासवड (ता.पुरंदर) ते श्रीक्षेत्र अरण या पायी वारीला श्री संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज पालखीचे श्रीक्षेत्र अरणकडे प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली.
"ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम" चा जय घोष करीत टाळमृदुंगाच्या गजरात पालखीने संत सोपानदेव महाराज यांच्या देऊळवाड्यातुन प्रस्थान ठेवले.
२९ जुलै रोजी सकाळी देवांना अँड. त्रिगुण गोसावी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येऊन श्री संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज व श्री संत सोपानदेव महाराज यांची भेट झाली.
दिंडी प्रमुख व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर अभंग होऊन पालखीची मंदिर प्रदक्षिणाहून पालखीने देऊळवाड्यातून पालखी पायी वारी सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवले.
श्रीक्षेत्र अरण या पायी वारीचे हे ५ वे वर्षे आहे. दि. २९ ला. सासवड, शिवरी मार्गे जेजुरी मुक्काम. पुढे ३० जुलै मोरगाव, ३१ जुलै क-हावागज, १ ऑगस्ट भवानीनगर, २ ऑगस्ट अंथूर्णे, ३ ऑगस्ट निमगाव केतकी,
४ ऑगस्ट सर्डेवाडी, ५ ऑगस्ट टेंभुर्णी,
६ व ७ ऑगस्ट अरण भेंडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे ह.भ.प. दिलीप महाराज झगडे यांचे काल्याचे किर्तन होईल.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुजबळ ब्रिगेडचे आबासाहेब भोंगळे, संस्थापक अध्यक्ष हभप दिलीप झगडे, सोहळा प्रमुख ह.भ.प. दत्तात्रय फरांदे, उपाध्यक्ष तुषार दुर्गाडे, सचिव बाळासाहेब बारवकर, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ पुणे कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, संघटक महावीर भुजबळ, सखाराम लांडगे, नंदकुमार दिवसे, संदीप राऊत, विजय वढणे, पोपटराव झगडे, मयूर भोंगळे, केतन भोंगळे, तुषार भोंगळे, अनिल लडकत, किसन वाघोली, आदी उपस्थित होते.