शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वृक्ष दत्तक प्रकल्प अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली. तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयांमध्ये यावर्षीपासून प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी देण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे शालेय परिसरामध्ये वड, पिंपळ, चिंच, लिंब, बेल, कौठ, करंज, भोकर अडुळसा, जांभूळ, बांबू, चाफा, अर्जुन, बेहडा अशा अनेक प्रजातीच्या देशी वृक्षांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आहे. विद्यालयामध्ये विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर यांचे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरे केले जातात.
विद्यालयाला भेट देणाऱ्या राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नेहमीच वृक्षारोपण केले जाते. यासाठी देवराई रोपवाटिकेचे प्रमुख रघुनाथ ढोले यांच्यावतीने विद्यालयास विनामूल्य देशी वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली जातात. स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवानिमित्त भविष्यात शालेय परिसरामध्ये एक एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची देवराई उभारण्याचा मानस ज्ञानदीप ग्राम विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. शालेय परिसरामध्ये देशी वृक्षांची लागवड केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जास्त पॉझिटिव्ह एनर्जी व ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी मदत होईल. या प्रकल्पासाठी विद्यालयाचे पर्यावरणविभाग प्रमुख गणेश मांढरे यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.