सासवड बापू मुळीक
पालखी महामार्गावर दिवे (ता पुरंदर)येथे फळबाजार सुरू पहिल्याच दिवशी शेतकरी व व्यापारी वर्गाचा प्रचंड प्रतिसाद,.
महामार्गावर दिवे येथे फळबाजार सुरू करण्यात आला यावेळी शेतकरी व व्यापारी बांधवांनी उत्सुर्तपणे गर्दी करत पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला दिवे व सोनोरि परिसरात फळबागांचे प्रमाण जास्त आहे इथले शेतकरी फळांचे दर्जेदार उत्पादन घेतात इथला माल हा स्थानीक सासवड बाजारपेठेत तसेच हडपसर पुणे मुंबई आदी बाजारपेठेत दररोज विक्री साठी पाठवला जातो परंतु मुख्य पिक सिताफळ जास्तीत जास्त सासवड बाजारपेठेत विकले जाते दिवे परिसरात असंख्य फळ उत्पादक कंपन्या आहेत बराच माल ते खरेदी करतात इथे पिकलेला माल सासवड बाजारपेठेत विक्री साठी घेऊन जायचे व परत बराच माल इथल्याच पल्ब उत्पादकांनी खरेदी करायचा व तो पुन्हा दिवे येथे घेऊन यायचे यावर तोडगा काढत दिवे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन दिवे ढुमेवाडि येथील पुणे पंढरपूर महामार्गावर आजपासून फळबाजार सुरू केला या बाजाराचे उद्गाटन माजी मंत्री दादा साहेब जाधवराव व युवानेते बाबासाहेब जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले
आज पहिल्याच दिवशी तब्बल तीनशे कँरेट सिताफळ पन्नास कँरेट पेरू डाळिंब अंजीर पपई या फळांची आवक झाली प्रतवारि नुसार एका कँरेटला पाचशे ते एकवीसशे रुपये बाजारभाव मिळाला आपल्या जवळच बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच या बाजारात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच भविष्यात भाजी बाजार सुद्धा सुरू केला जाईल अशी माहिती सरपंच गुलाब झेंडे यांनी दिली यावेळी दिवे गावचे सरपंच गुलाब झेंडे झेंडेवाडिच्या सरपंच पुनमताई झेंडे सोनोरिचे सरपंच नितीन काळे उपसरपंच श्रद्धा काळे झेंडेवाडिच्या उपसरपंच कौशल्या झेंडे माजी सरपंच अमित झेंडे ग्रामपंचायत सदस्य रूपेश राऊत शोभा टिळेकर शोभा लडकत भारती आढाळगे शोभा झेंडे सुमन टिळेकर सुजाता जगदाळे योगेश काळे निताताई लडकत शिवाजी खटाटे अतुल जाधव अशोक कुंभार बाजीराव ढुमे दिलीप झेंडे भाऊसाहेब झेंडे नामदेव झेंडे नारायण जाधव रेवननाथ जाधव अतुल पाटील प्रदीप जगदाळे बापु सोपान टिळेकर व ग्रामस्थ शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिवे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते