सासवड बापू मुळीक
सासवड :पुरंदर ची माती ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. या प्रेरणेतूनच मी देशासाठी काम करीत आहे . असे प्रतिपादन पुरंदर चे रहिवासी व भारतीय विषाणू संस्थेचे शास्त्रज्ञ बिपीन एन टिळेकर यांनी केले आहे.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर यांचे वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून२००९ साली स्वाईन फ्लू चा पहिला रुग्ण शोधण्याचे काम करणारे शास्त्रज्ञ बिपीन टिळेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर हस्ते सत्कार करण्यात आले . प्रशासकीय सेवेत असताना संपूर्ण देशात काम करावे लागते. वेगवेगळ्या राज्यात जाऊन काम करताना तेथील सामाजिक वातावरण जाणून घ्यावे लागते .मी ६४ साथीचा अभ्यास केला .एखाद्या रोगाची वेगळी लक्षणे दिसताच संशोधन करावे लागते . मी एका जिद्दीने व ध्येय ठेऊन शिक्षण घेतले देशासाठी काम करण्याची ऊर्जा पुरंदरच्या मातीतून मिळाली असेही टिळेकर म्हणाले.
निलेश शेंडकर (पोलीस उपनिरीक्षक )पूनम खिलारे (पोलीस निरीक्षक )शुभदा विजय भोंगळे-शुक्रे (न्यायाधीश )प्रज्ञा काकडे (तहसीलदार )अभिजित भगत (उपअधिक्षक भूमी अभिलेख सोनूल कोतवाल (प्रकल्प अधिकार )सुशांत क्षीरसागर (एम बी बी एस ) प्रणिता काकडे (स्पेशालिस्ट ऑफिसर कृषी ) यांचा सत्कार या वेळी करण्यात आला . आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान गेली २० वर्ष असा जारकर्म करीत असून चांगले काम करण्याची दिशा देण्याचा उद्देश आहे . पुरंदर हा बुद्धीची श्रीमंती असलेला तालुका आहे . या मुलांच्या यशात आई वडील शिक्षक यांचाही मोठा वाटा आहे . असे विजय कोलते यांनी सांगितले . "दुष्काळी तालुक्यतील मुले स्पर्धा परीक्षेत पुढे असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाजाचे उत्तरदायित्व स्वीकारून काम करावे असे उमेश तावस्कर यांनी सांगितले . सोनूला कोतवाल ,अभिजित भगत ,निलेश शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले बाळासाहेब मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण यांनी स्वागत केले. सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले .कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या विश्वस्त माई कोलते ,साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष ऍड अण्णासाहेब खाडे ,प्रतिष्ठानचे सहसचिव गौरव कोलते ,बंडूकाका जगताप ,रमेश कोतवाल, श्रीहरी कोतवाल, रवींद्र पोमण, कुंडलिक मेमाणे इ उपस्थित होते .