मांडवगण फराटा - एकनाथ थोरात
शिंदोडी (ता.शिरूर) येथील सुप्रभात महिला मंडळ संचालित कै हरूबाई उमाजी शितोळे या विद्यालयात आषाढी वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी विविध संताची वेशभुषा साकारत गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी गंध व अभंग भारुडे, गीत सादर केले.कार्यक्रमासाठी गावातील पालक ग्रामस्थ विशेष करून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वच्छता तेथे शांती..... जल है तो कल है..... पर्यावरणाचे रक्षण हेच आमचे लक्षण असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून ग्रंथदिंडी , पालखी सोहळ्याचे आयोजन करत ज्ञानोबा - तुकाराम जयघोष करत वारीचा अनुभव घेऊन परिसर दणाणून सोडला होता,
शाळेत आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांना संतांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या बालवारीचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी विठ्ठल - रुक्मिणी , मुक्ताबाई , ज्ञानदेव , एकनाथ,अशा विविध संतांच्या व छत्रपती शिवाजी महाराज या वेशभूषा साकारल्या होत्या . गळ्यात टाळ , डोक्यावर तुळस व मुखी हरिनाम घेत संपूर्ण गावातून दिंडी निघाली होती . मंदिराच्या आवारात विद्यार्थ्यांनी अभंग , भजन यांचे गायन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते .
राधे कृष्ण गोपाल कृष्ण म्हणत विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी फुगडी चा ठेका धरला.फुगड्या खेळत अतिशय उत्साही , आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या वारीची अनुभूती घेतली . असून ती विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोगात आणली जाणार असल्याचे मुख्याध्यापक सुरेश बांबळे सर यांनी सांगितले
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे शिक्षक शिंदे सर, उबाळे मॅडम , भोस सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश बांबळे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा खेडेकर व सचिव स्मिता पाटक उपस्थित होत्या.